पार्डी गावात विकसित भारत संकल्प यात्रेचे जंगी स्वागत

Raw Bharat
0

अध्यक्षस्थानी उपसरपंच संगीता राठोड तर मार्गदर्शक बीडीओ संजय राठोड सर

  पुसद - (तालुका प्रतिनिधी )

पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पार्डी गावात विकसित भारत संकल्प यात्रेचे भव्य  स्वागत करण्यात आले.  विविध योजनाची माहिती गावागावात पोहोचावी यासाठी संपूर्ण देशभर या यात्रेचे आयोजन करुन  ही मोहीम राबविली जात आहे. 



 


कार्यक्रमाच्या सुरवातीला राष्ट्रसंत गाडगेबाबा व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्य्यक्षस्थानी पार्डीच्या उपसरपंच संगीता ज्ञानेश्वर राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय राठोड लाभले होते. मंचावर पुसद पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पिंपले साहेब, डाखोरे साहेब, बोजेवार साहेब, शाखा अभियंता चव्हाण साहेब व रथ सारथी प्रवीण पारधे उपस्थित होते. 

 



 

विकसित भारत संकल्प  यात्रेच्या  व्हॅनमधील चित्रफितीच्या आधारे गटविकास अधिकारी संजय राठोड यांनी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला योजना, हर घर नल योजना, पीक विमा, जनधन योजना, प्रधानमंत्री सन्मान निधि योजना, बचत गट - ड्रोन योजना अशा अनेक योजनेची  माहीती  लाभार्थ्यांना दिली.  व योजनाचा लाभ घेण्याचे सर्व नागरिकाना आवाहन केले.

 



कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सर्व सन्मा. सदस्य, जि. प. शाळेच्या मुख्यध्यापीका बेद्रे मैडम, सर्व शिक्षकवृन्द, आरोग्य विभागाच्या सि, एच. ओ. राठोड मैडम, आरोग्य सेविका एस. पि. क्षिरसागर, आशा वर्कर पल्लवी बरडे, सीमा पेंढारकर, विद्या जाधव, माया राठोडकृषि सहाय्यक करे, तंटामुक्त समिती अध्यक्ष विट्ठलराव जाधव, उमेद्च्या सीआरपी वंदना काकडे, ग्रामपंचायत सचिव विजय ईसळकर, कर्मचारी समाधान शिनगारे, ओंकार पवार, गावातील प्रमुख प्रतिष्ठित नागरिक, शाळेतील विद्यार्थी व हजारो नागरिक उपस्थित होते. 

 


कार्यक्रमात समाधान केवटे यांनी जल स्वराज मिशन योजनेची सविस्तर माहिती दिली. संदीप भोने, लहू गवळी, ताईबाई सुरोशे व आम्रपाली केवटे इत्यादी लाभार्थ्यानी विविध योजनेबाबत आपापले मत व्यक्त केले. 


विकसित भारत सकल्प यात्रेचा समारोप जि. प. शाळेतील मुलींच्या देशभक्ती गीताने करण्यात आली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अरुण बरडे यांनी केले. 




आपल्या परिसरातील बातम्यासाठी  व जहिराती संपर्क करा. 

👉 अरुण बरडे मो. नं. ९९२१७२२७२६ 

👉 रवि शिंगनकर मो. नं. ८७८८८६४२९८


         

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)