पत्रकार राजेश ढोले महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित !

Raw Bharat
0


 पुसद -

    रिपब्लिकन वार्ताच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित डॉ. झाकीर हुसेन सभागृह इक्बाल नगर पूर्णा, जिल्हा परभणी येथे झालेल्या कार्यक्रमात, रिपब्लिकन वार्ता समूहाचे विदर्भ विभाग उपसंपादक राजेश ढोले यांना राजकीय, पत्रकारीता क्षेत्रात, तसेच त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र भूषण पुरस्काराने, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरवविण्यात आले.

    यावेळी प्रमुख पाहुणे, डॉ. जयप्रकाश मोदानी, राज्यपाल पुरस्कार प्राप्त धनराज गवळी, प्रा. श्रीकांत सोनवणे, तर मंचावर अभिमान पवार, रिपब्लिकन वार्ताचे मुख्य संपादक डॉ. अनिल आठवले, कार्यकारी संपादक सलीम सय्यद व्यवस्थापक सुनील आठवले,  रवींद्र कुमार, आयोजक सलीम सय्यद सुहागणकर फुलंब्री, औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा, अनिल कळंके नाशिक, विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, एडिटर विभागाचे युवराज हंगेकर, केळापूर यवतमाळ प्रतिनिधी हनुमान लसंते इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 


Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)