पुसद - जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा पार्डी येथे आज गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागोराव शिरमाडे हे होते तर मंचावर शिक्षण प्रेमी अरुण बरडे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शिवकन्या तोरडमल, परसराम केवटे, शरद गवळी, वानखेड़े ई उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. तसेच शाळेतील कब व बुलबुल च्या विध्यार्थ्याना सुद्धा गणवेश वाटप करण्यात आले.
यावेळी मान्यवरानी विध्यार्थ्याना निटनेटकेपना, स्वच्छता व अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष वाघोड़े सर यानी तर आभार प्रदर्शन मुख्याधापक पदमावर सर यानी केले. कार्यक्रमाला देवकते सर सह सर्व शिक्षकवृन्द व विधार्थी उपस्थित होते.


