पुसद -
आज शासकीय विश्रागृह यवतमाळ येथे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेची यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीची सभा संपन्न झाली. सभेला प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे संस्थापक राज्य सरचिटणीस गिरिशभाऊ दाभाळकर तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटना NGP 5768 चे राज्यध्यक्ष मा.श्री.गुणवंतजी राठोड हे होते.
सभेत संघटनेची पुढील दिशा, संघटनेची गरज व संघटनेचा विस्तार यावर चर्चा करण्यात आली. व जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली. सभेत जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील तालुकाध्यक्ष यांच्या सहमतीने व साक्षीने यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी प्रफुल्ल जाधव यांची तर जिल्हासचिव पदी अरूण बरडे यांची निवड करण्यात आली.
जिल्हा कोषाध्यक्ष पदी सचिन पवार, जिल्हा सहकोषाध्यक्ष पदीअमोल राऊत, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी प्रेम राठोड, जिल्हा सह संघटक पदी कैलास पुरी, व जिल्हा तांत्रिक सल्लागार पदी अविनाश वानखडे यांची निवड करण्यात आली. महिला प्रमुख म्हणून प्रतिभा सुखदिवे तर महिला सदस्य म्हणून जया लाभशेटवार, उर्मिला अंबोरे, उर्मिला उघडे, मुक्ता बोर्डे, नमिता ठाकरे यांची निवड करण्यात आली.
जिल्हा कार्यकारिणीत सदस्य म्हणून ईश्वर जाधव, चेतन पावडे, दिलीप पवार, अमर चव्हाण, राजकुमार वडस्कर, इरफान शेख, गणेश अडकार, बशीर शेख, आशिष भोयर, रामेश्वर आदे,यांची निवड करण्यात आली.
सभेला यवतमाळ जिल्हयातील सर्व तालुकाध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.



