विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन । Bodybuilding Competition 2024

Raw Bharat
0

 
विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन । bodybuilding competition 2024

येथील रावजी व्यायाम

प्रसारक मंडळाद्वारे रावजी फिटनेसच्या पुढाकाराने २८ जानेवारी रोजी सायंकाळी स्थानिक अग्रवाल मंगल कार्यालयाच्या मैदानात बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन विदर्भ यांच्या मान्यतेने व यवतमाळ जिल्हा बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस सहकार्याने असोसिएशनच्या 'विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे दुसऱ्यांदा आयोजन केले आहे.

या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ चॅम्पियन रावजी श्री २०२४ रु.१,११,१११ प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकाला, वजन गट ५५ किलो पर्यंत, ५५ ते ६०, ६० ते ६५ कि.

स्पर्धेत ५ लाख २३ हजार १११ रु. ची बक्षीसे

हे ही वाचा 👉पत्रकार चषक 2024 संपन्न । Journalist Cup 2024 concluded

६५ ते ७० कि., ७० ते ७५ कि. ७५ ते ८० कि., ८० व त्यापुढील असे एकूण सात वजन गटात प्रत्येकी १५,११,९, ७ व ५ हजार अशी पाच बक्षिसे याशिवाय बेस्ट मसल मॅन ४१ हजार, बेस्ट पोजर ३१ हजार, पुसद श्री ११ हजार रुपये अशी ट्रॉफीसह एकूण ३९ बक्षिसे, सर्व स्पर्धकांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष व आयोजक
विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन । bodybuilding competition 2024

वैभव फुके यांनी पत्रपरिषदेत दिली. सहभागी होण्यासाठी वैभव फुके

   विदर्भ उपाध्यक्ष अविनाश लोखंडे यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर मिस्टर वर्ल्ड, आर्मी मॅन अनुज कुमार तालियान आणि मिस्टर इंडिया पोलीस मॅन नरेंद्र यादव स्पर्धेचे मुख्य आकर्षण आहेत

Live Watch 👉 Bodybuilding Competition 2024

हे ही वाचा 👉कुंभकर्णी झोपेतील प्रशासनाला जागविण्यासाठी ताला ठोको आंदोलन | Pusad 

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)