उत्कृष्ट तालुकाध्यक्ष पुरस्काराने समाधान केवटे सन्मानित

Raw Bharat
0


व्हाँईस ऑफ मीडिया अवाँर्ङ 2023  

राज्य उत्कृष्ट तालुकाध्यक्ष पुरस्काराने समाधान केवटे सन्मानित

पुसद प्रतिनिधी - 

हाराष्ट्र शासन व्हॉईस ऑफ मीडिया व शेठ ब्रिजमोहन लढ्ढा सेवा प्रतिष्ठान मुंबई यांच्या  वतीने आयोजित  व्हॉईस ऑफ मीडिया महाराष्ट्र भूषण  2023 व व्हाँईस  ऑफ मीडिया जर्नलिझम अवाँर्ङ  2023  पुरस्कार सोहळ्याचे आयोजन मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे 26 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 4  वाजता करण्यात आले होते.

यामध्ये विदर्भ विभागातून  उत्कृष्ट तालुकाअध्यक्ष म्हणून व्हाँईस ऑफ मीडिया पुसदचे अध्यक्ष समाधान  केवटे यांचा २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे सन्मानपत्र  व शाल देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

दर पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आ. रोहित पवार, युवा सेना अध्यक्ष आ. आदित्य ठाकरे, अमरावतीच्या आमदार यशोमती ठाकूर, आ. राहुल पाटील तसेच व्हाँईस ऑफ मिडीयाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे. प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के. उपस्थित होते.

यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया यवतमाळ जिल्हा आरोग्य समन्वयक पदी समाधान  केवटे यांची नियुक्ती भिमेश मुतूला. राष्ट्रीय अध्यक्ष आरोग्य सेल व तुषार रसाळ कार्याध्यक्ष आरोग्य सेल यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली.

या सत्कार सोहळ्याला व्हाँईस ऑफ मीडिया संघटना पुसदचे कोषाध्यक्ष प्राध्यापक एस. एल. राठोड. प्रसिद्धी प्रमुख अरुण बरङे संघटक रवी खरात. यांच्यासह महाराष्ट्रातील व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 

आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी व जाहिरातींसाठी 

आमच्या चॅनेल ला subscribe करा.

बातम्यांसाठी व जाहिरातींसाठी आम्हाला संपर्क करा.

अरुण बरडे - 9921722726

रवी शिंगणकर - 8788864298

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)