कधी संपणार नारी ! तुझा वनवास ग !! आशा वर्कर जीआर च्या प्रतिक्षेत ....

Raw Bharat
0

  •  आशा वर्कर व गटप्रवर्तकांच्या आंदोलनाला आज दोन महिने पूर्ण
  • अद्याप शासनाने घेतली नाही त्यांच्या रास्त मागण्यांची दखल !
  • नुसते पोकळ आश्वासन दिले .. जिआर ची अजुनही प्रतीक्षा 
  • मुंबईच्या आंदोलनात हजारो आशा सहभागी
  • पोलिसांचा लाठीचार्ज 

आशा वर्कर जीआर च्या प्रतिक्षेत ....

शा वर्कर व गटप्रवर्तकांचे रास्त व प्रलंबित मागण्यांसाठी मुबई येथील आझाद मैंदान येथे आंदोलन सुरु असून महाराष्ट्रातील आशा वर्कर व गटप्रवर्तक  ठिय्या देऊन बसल्या आहेत. 

शा वर्कर ह्या ग्रामीण स्तरावर आरोग्यविषयक हजारो प्रकारची कामे अत्यंत तूटपुन्ज्या पैशाच्या मोबदल्यात मागील १३ वर्षापासून करीत आल्या आहेत. त्याच्यामुले  महाराष्ट्रातील माता व बालमृतु कमी झाले आहेत. गरोदर माता व बालकांचे लसीकरण पूर्ण होण्यास मदत मिळत आहे. शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविन्यात तसेच जनमानसात आरोग्य विषयक जनजागृती करण्यात आशांचा मोलाचा वाटा आहे. कोरोना काळात तर त्यांनी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे. 

शी ही आशा आज तिच्या न्याय व हक्कासाठी मुंबईच्या रस्यावर उतरली आहे. शासनाने त्याना मानधनवाढ जाहिर केली पण प्रत्यक्षात अमलबजावणी करण्यास सरकार टालाताल करताना दिसून येत आहे. आझाद मैदान येथे त्या लोकशाही मार्गाने आन्दोलन करीत असताना त्यांच्यावर पोलीस प्रशासनच्या वतीने लाठीचार्च करण्यात येत आहेत. आन्दोनन मोड़कलिस नेण्याचा प्रयत्न शासन करीत आहे. मात्र जीव गेला तरी  कोणत्याही परिस्थितीत न्याय मिलाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे त्यानी आमच्याशी बोलताना सांगितले. 

आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी व जाहिरातींसाठी आमच्या चॅनेल ला subscribe करा.

बातम्यांसाठी व जाहिरातींसाठी आम्हाला संपर्क करा.

अरुण बरडे - 9921722726

रवी शिंगणकर - 8788864298


Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)