उन्हाळा अखेर संपला ? | Raw Bharat

Raw Bharat
0

 आसोली या गावचा उन्हाळा अखेर संपला.......!!


पुसद पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आसोली येथे गेल्या अनेक दशकापासून गावामध्ये पाण्याची भीषण समस्या होती.

ही समस्या मिटवण्यासाठी गावकऱ्यांनी नाना प्रकारचे प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही.

इंजिनीयर तथा ग्रामपंचायत सदस्य यशवंत कोल्हे आणि त्यांचे आणि टीमने आणि गावातील नागरिकांच्या सहका-याने चालू पंचवार्षिक योजनेच्या अंतर्गत शासन दरबारी गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या, स्मशानभूमीची समस्या या सर्व समस्येचा पाठपुरावा प्रशासनाला करीत यशवंत कोल्हे आणि काही स्वाभिमानी नागरिक वारंवार कलेक्टर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटून पाठपुरावा करीत राहिले. अहोरात्र प्रयत्न करीत राहिले  मागच्या महिन्यात यशवंत कोल्हे आणि त्यांच्या गावातील सहकार्याने मिळून पाणीपुरवठा विभाग पुसद कार्यालयासमोर  अमरण उपोषण सुद्धा केले या उपोषणापासूनच प्रशासन जागी झाले आणि योजनेला एक गती मिळाली आज या योजनेच्या विहिरी मधून गावातील विहिरीमध्ये पाणी सोडण्यात आले शेवटीला गावातील महत्त्वाची पाण्याची समस्या पूर्ण झाली......!!!

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)