पार्ङी परिसरात अवकाळी पावसाने केळी पिकाचे नुकसान | raw Bharat

Raw Bharat
0

 पार्ङी परिसरात अवकाळी पावसाने केळी पिकाचे नुकसान


पुसद - 

पुसद तालुक्यातील पार्ङी  परिसरात 28 एप्रिलच्या रात्री एक वाजताच्या  दरम्यान अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्याच्या तडाख्याने  पाऊस पङल्याने पार्ङी येथील  युवा शेतकरी विक्की झरकर. यांच्या 6 एकर  व अमोल झरकर यांचे  3 एकर  काढणीयोग्य केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच टरबुज उन्हाळी तीळ ज्वारी  भाजीपाला   पीकाचे नुकसान झाले आहे व घरावरील टिन पत्रे उडाली आहे.

दोन-तीन दिवसापासून दररोज रात्री एक ते तीनच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस येत असल्यामुळे  उन्हाळी तीळ ज्वारी केळी टरबुज भाजीपाला पीकाचे नुकसान झाले आहे सदर नुकसानीचा प्राथमिक अहवाल तलाठी अमोल राठोड यांनी सादर केल्याचे सांगितले आहे.

निंबी ते पार्ङी रस्ता बंद

पुसद तालुका अंतर्गत येत असलेल्या निंबी ते पार्ङी रस्त्यावर बाभळीचे झाड पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. नागरिकांचे यावेळी ताराबळ उडाली होती.  

- बुरो रिपोर्ट रॉ भारत 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)