पार्ङी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार #Raw Bharat

Raw Bharat
0

 पार्ङी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पुसद - 

तालुक्यातील पार्ङी  येथील श्री.मनोहरराव नाईक विद्यालयाच्या वतीने दहावीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष सोनोने यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सती सामत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गजानन मोगरे सर  हे होते.

प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष कैलास चंद्रवंशी साहेब, सचिव प्रमोद चंद्रवंशी साहेब, मुख्याध्यापक संतोष सोनोने सर, सचिन सवई सर, पत्रकार  समाधान केवटे व अरुण बरङे.उपस्थित होते.

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोगरे सर, समाधान केवटे, अरुण बर्डे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दारासिंग चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन बाजीराव आढाव यांनी केले. कार्यक्रमाला मनोहरराव नाईक विद्यालयाचे सर्व  शिक्षक वृंद व विद्यार्थी  व पालक उपस्थित होते.

- सह-संपादक - अरुण बरडे 

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)