Badlapur : चिमुकलींवर लैंगिक अत्याचार बदलापुर | Raw Bharat

Raw Bharat
0

 




बदलापुर प्रतिनिधी :

      बदलापुरातील आदर्श विद्यालयातील दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये एकच संताप उसळला. लोकं रस्त्यावर उतरली. बदलापूरकरांनी लोकल सेवा बंद पाडली. गेल्या ८ तासांपासून रेल्वे बंद आहेत. आंदोलन संपवण्याचं आवाहन केलं जात आहे. पण लोकांकडून गुन्हेगाराला फाशी देण्याची मागणी केली जात आहे.

        एका चिमुरडीने आपल्या आईकडे तिला गुप्तअंगात त्रास होत असल्याची तक्रार केली. त्यानंतर पालकांनी तिला डॉक्टरांकडे आणलं. जेव्हा डॉक्टरांनी तिला तपासलं तेव्हा ही धक्कादायक घटना समोर आली. आपल्या चिमुकलीसोबत जे घडलंय ते ऐकून पालकांच्या पायाखालची जमिनच सरकली. ही घटना १२ आणि १३ ऑगस्ट रोजी घडली. पण या घटनेवर कारवाई करण्यास पोलिसांक़डून दिरंगाई झाली. त्यामुळे बदलापुरात मोठा उद्रेक झाला.

       अक्षय शिंदे नावाच्या व्यक्तीने चिमुरडीला आपल्या वासनेचं बळी बनवलं. आदर्श विद्यालयात ही धक्कादायक घटना घडली. ही घटना जशी जशी सोशल मीडियावर पसरली. लोकांचा उद्रेक झाला. लोकं रस्त्यावर उतरली. संताप व्यक्त करु लागली. पोलिसांनी रेल्वे रुळावरुन आंदोलकांना हटवण्यासाठी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. पण संतप्त लोकांनी दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी ही मागे जावं लागलं. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही असं संतप्त नागरिकांकडून सांगितले जात आहे.

       सरकारच्या वतीन मंत्री गिरीष महाजन बदलापूर स्टेशनवर पोहोचले आहेत. बदलापुरात कडकडीत बंद पाळला जात आहे. रिक्षा, दुकानं बंद आहेत. बदलापुरात तणावाचं वातावरण आहे. गिरीष महाजन यांच्याकडून सातत्याने आंदोलन शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जबाबदार पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले आहे. अशी माहिती ही त्यांनी दिली आहे. आंदोलकांकडून दोषीला फाशी देण्याची मागणी होत आहे.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)