पार्डी अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत कार्यालय पार्डी, जिल्हा परिषद शाळा पार्डी व श्री मनोहरराव नाईक विद्यालय पार्डी येथे भारताचा ५८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या हर्षोउल्हासात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत कार्यालय पार्डी येथे सकाळी ७ वाजता गावच्या सरपंच उषाबाई विठ्ठल जाधव यांच्या हस्ते, अधिनस्त आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, महसूल कर्मचारी, ग्राम पंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य व कर्मचारी, गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि असंख्य विद्यार्थी बालमित्रांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळा पार्डी व श्री मनोहरराव नाईक विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन कॉम्प्युटर ऑपरेटर अरुण बरडे यांनी तर आभार प्रदर्शन पदमावर सर यांनी
केले.
त्यानंतर शेवटी श्री मनोहरराव नाईक विद्यालय पार्डी येथे शाळेचे अध्यक्ष मोगरे सर, शाळेचे सचिव चंद्रवंशी साहेब, मुख्याध्यापक सोनवणे सर, ठवरे सर, सर्व शिक्षक वृंद कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत पार्डीचे सरपंच उपसरपंच सर्व सन्माननीय सदस्य कर्मचारी उपस्थित होते. यावेळी गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमात मुलांनी सादर केलेली भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या फाशीची नाटिका कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दारासिंग सर आणि आभार प्रदर्शन सोनवणे सर यांनी केले.



