अपघाताला निमंत्रण देणाऱ्या रस्त्या कडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दूर लक्ष | Raw Bharat

Raw Bharat
0

 

खंडाळा घाटातील रस्त्याच्या कडेला पडलेला  मोठा खड्डा देतोय अपघाताला निमंत्रण

पुसद प्रतिनिधी :

    पुसद - वाशीम मुख्य रस्त्यावरील खंडाळा घाटातील रस्त्याच्या कडेला एका पुलावर भल्ला मोठा खड्डा पडला आहे.या मार्गांवरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना जिवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून हा खड्डा जणू काही अपघाताना निमंत्रण देत आहे. या मार्गावर पुसद शहरातुन वाशिम अकोला बुलढाणा शेगाव  मुंबई पुणे येथे  खाजगी ट्रॅव्हल्स, एसटी महामंडळ फोर व्हीलर टू व्हीलर सकाळ संध्याकाळ ये-जा करीत असतात तर दुसरीकडे दिवस - रात्र वाहतूक सुरू असते  या वाहनांचे लाईट समोरच्या वाहनांवर होते त्यावेळी या वाहनधारकांना अचानक समोरचं दृश्य दिसेनासे होते त्यावेळी या रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्डयात ते चारचाकी दुचाकी वाहन जावुन अपघात होण्याची शेक्यता नाकारता येत नाही, पंरतु या खड्डयाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

     पुसद ते वाशिम मार्गावरील खंडाळा घाटातील रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावरील हा भल्ला मोठा खड्डा  रहदारीस अडथळा निर्माण करीत असून अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे.या पुलावर मोठे भगदाड व खड्डा पडला आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. 

हे ही वाचा - बेलोरा येथे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कार्यक्रमाचे आयोजन

   एखादा मोठा अपघात होण्याची वाट, तर सार्वजनिक बांधकाम विभाग पहात नाही ना, असा प्रश्न सर्वसामान्य उपस्थित करीत आहेत. रस्त्यावरील खड्डा बुजवला जात नसल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे या खड्ड्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरीक आणि वाहनधारकांच्या वतीने करण्यात येत आहे.

                                                                                                 ब्युरो रिपोर्ट - Raw Bharat।अश्विन केवटे


Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)