पार्डीसह संपूर्ण जांबबाज़ार सर्कल जलमय .. शेतकरी हवालदिल #Rawbharat

Raw Bharat
0


पुसद प्रतिनिधी - 

निसर्ग सर्वशक्तीमान आहे, हे आज त्यांने दाखवून दिले आहे.  पुसद तालुक्यातील सर्वच ठिकाणी त्याचे उग्ररूप पहायला मिळाले.  शनिवार दिनांक ३१ ऑगस्टच्या मध्यरात्री पासुन मुसळधार पाऊसाने  सुरुवात केली होती. पार्डी, निम्बी, गाजीपुर, भोजला, येलदरी, जांबबाज़ार सह असंख्य गावांना पावसाने झोडपून काढले आहे. पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिके खरडुन गेली आहेत, शेतात पाणी साचले आहे. यामधे ओढ्या व नदीकाठच्या शेतीला जास्त फटका बसला आहे. शेतातील सर्व पिके, अवजारे ,शेतीउपयुक्त साहित्य, साठवलेले धान्य  पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहुन गले आहे .


शेतशिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या आहेत, अनेक गावातील घरांची पडझड झाली.  पार्डी गावातील श्री हनुमान मंदिर व श्री महादेव मंदिराला पुराच्या पाण्याने पूर्णपणे घेरले होते. गावातील काही लोकांच्या घरात पाणी साचले होते. शासनाने  झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी. अशी सर्व नागरिकांची व  शेतकऱ्यांची  मागणी आहे. 


वेळेचे गांभीर्य पाहून तलाठी अमोल राठोड, ग्रामसेवक विजय ईसळकर सह ग्रामपंचायत पदाधिकारी यानी गावाना व शेतकरी बांधवाना भेटी देऊन प्राथमिक अहवाल शासनाला सादर करीत नागरिकांचे सांत्वन केले. व पुढील काही दिवस सतर्क राहन्याचे आवाहन केले. 


Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)