ययाती नाईकासह १७ उमेदवारांनी मागे घेतली उमेदवारी | Raw Bharat

Raw Bharat
0

पुसद विधानसभा क्षेत्रातील  राजकीय घडामोडी : ययाती नाईकासह   १७ उमेदवारांनी मागे घेतली उमेदवारी


पुसद प्रतिनिधी :

पुसद विधानसभा क्षेत्रात राजकीय घडामोडी. येथील अपक्ष उमेदवार, ययाती नाईक यांनी आपली उमेदवारी अचानक मागे घेण्याचा निर्णय घेतल्या मुळे विद्यमान आमदार  इंद्रणील नाईक यांना मिळाला दिलासा, 

जर ययाती नाईक यांनी आपली उमेदवारी कायम ढेवली असतीतर आमदार इंद्रणील नाईक यांना हि निवडणूक अतिशय अवघड व कस्टदाई  ठरली असती,परंतु ययाती नाईक यांचे बंड शमविण्या मध्ये नाईक घराण्याला यश आल्या मुळे आमदार इंद्रणील नाईक यांचा एक प्रकारचा रास्तच मोकळा झाला तरीपण पुसद विधान मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे व शरद चंद्र पवार राष्ट्रवादीचे उमेदवार शरद मैंद यांचं कडव आव्हान असल्यामुळे व त्याच बरोबर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माधवराव वैद्य अस्या तगड्या उमेदवाऱ्या मुळे हि निवडणूक पाहिजे तेवढी सोपी नाही. 

या मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अश्विन जैस्वाल यांची सुद्धा उमेदवारी कायम असल्याने हिंदू मतावर याचा किती परिणाम होईल हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे. या सर्वाना मिळून १३ उमेदवार रीगणात असून, 

त्यांच्या सुद्धा उमेदवारीमुळे कोणाच्या मतावर परिणाम होईल हे पाहण्याचा विषय आहे, या राजकीय हालचालीमुळे पुसद विधानसभेत सत्तासंघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. 

स्थानिक नेत्यांमध्ये मतांसाठी नवा खेळ रंगू शकतो, ज्यामुळे निवडणुकीत राजकीय समीकरणे अधिकच रोचक होतील. उमेदवारांच्या माघारीमुळे आता या क्षेत्रात विविध पक्षांमधील स्पर्धा कशी रंगेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)