आईवर शिवी देण्याच्या कारणावरून हत्याकांड

Raw Bharat
0

     आईवर शिवी देण्याच्या कारणावरून केली हत्या

    आरोपी पोलिसांच्या ताब्यात. हैदराबाद रवाना होणाऱ्या आरोपींना पोलिसांनी सीताफिने घेतले ताब्यात. गुणवंतराव शाळा परिसर कवडीपूर येथील रहिवासी असलेले गजानन शंकर काळे वय पंचवीस वर्षे व शेख समीर शेख सलीम व 26 वर्ष असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. 


               पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हत्येच्या घटनेने सर्वत्र खळबळ माजली होती. आज सकाळी सात वाजता चे दरम्यान हत्या झाल्याचे उघड झाल्यानंतर अनोळखी मृतदेहाची ओळख पटविली. गंगानगर येथील रहिवासी अजय शालीकराव येवले वय 40 वर्ष याचा मृतदेह असल्याची माहिती समोर आली

     त्यानंतर पोलिसांसमोर आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. परंतु वसंतनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण नाचणकर यांच्या मार्गदर्शनास पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक चव्हाण व मुन्ना आडे यांनी गोपनीय माहिती घेऊन नायक पोलीस शिपाई कुणाल मुंडोकार, संजय पवार, सतीश शिंदे, सचेत्त वानखडे व चालक अनंता तारमिकवार यांनी आरोपींना शोधून त्यांना ताब्यात घेण्याचे कामगिरी केली आहे. घटनेनंतर आरोपी हे हैदराबाद येथे फरार होण्याच्या मार्गावर असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सतर्कतेने व गोपनीय पद्धतीने अगदी सीताफीने दोन्ही आरोपींना पुसद बस स्थानकावरून ताब्यात घेतले. गुन्हा उघडकिस आणण्याच्या वसंतनगर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होतांना दिसत आहे.

           सदरचे हत्याकांड हे आईवर शिवी देण्याच्या कारणावरून घडले ची माहिती समोर येत आहे.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)