ठाणे शहरातील दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन

Raw Bharat
0

 ठाणे शहरातील दीड दिवसाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन मोठ्या आनंदात पार पडले. 

उपवन तलावाच्या जवळच ठाणे महानगर पालिकेने बनविलेल्या कृत्रिम तलावात पोलिस प्रशासन व पालिका प्रशासन अधिकात्यांच्या बंदोबस्तात रीतशिर व शांततेत पार पाडले , टी एम सी च्या एका अधकाऱ्याने दिलेल्या माहितनुसार हा विसर्जनाचा  कार्यक्रम रात्री बारा ते एक वाजे पर्यन्त म्हणजे शेवटचा गणपती बाप्पा  जो पर्यन्त येणार तो पर्यन्त चालू ठेवण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. तसेच या विसर्जन सोहळ्यात अंदाजे ऑफ लाईन व ऑनलाइन 2 हजार गणरायांचे विसर्जन  होण्याची शक्यता वर्तविली जात होती. 



कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने खुप मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. व त्याच बरोबर पालीका कर्मचारी देखील आपापल्या जबाब दारी ने आपले कर्तव्य बजावत असताना दिसुन येत होते.

   बापाच्या विसर्जनाची व्यवस्थित  तयारी करण्यात आली होती. एका बाजूला आरती करीता टेबल आणि मंडपाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली होती. आरती झाल्या नंतर लगेच एका रांगेत एकापाठोपाठ गणेश भक्त आपापली गणरायाची मूर्ती घेऊन तलावा कडे जाऊन व्यवस्तितपणे बाप्पांचे विसर्जन केले.

                                                                                       प्रतिनिधी । जगदीश राठोड - मुंबई 

                                   


Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)