पुसद तालुक्यातील ग्रामपंचायती शटडाऊन .. केन्द्रचालक संपावर

Raw Bharat
0




 पुसद प्रतिनिधी -

         संगणक परिचालक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध मागण्या संदर्भात काम बंद आंदोलन सुरू केले आहे.पुसद तालुका संगणक परिचालक संघटना यांनी नुकतेच पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व तालुका व्यवस्थापक आपले सरकार सेवा केंद्र यांना काम बंद आंदोलनाचे निवेदन दिले आहे.




मागण्यामधे -

१) थकीत इंटरनेट बिल दिवाळीपूर्वी देण्यात यावे. 

२) संगणक परिचालकाना सुधारित आकृतीबंधात समाविष्ट करून घेणे. 

३) समावेश होत नाही तोपर्यंत 20 हजार रुपये मानधन देणे. 

४) प्रोजेक्ट व्यतिरिक्त कामे दिल्यास त्याचा वेगळा मोबदला देणे. 

५) कंपनी व शासनाने दिलेली चुकीची टार्गेट पद्धत बंद करणे. 

६) दिवाळीपूर्वी थकीत मानधन जमा करणे. व 

७) मिळत असलेला मानसिक त्रास बंद करणे इत्यादी मागण्यांचा समावेश आहे.

     निवेदन देताना तालुकाध्यक्ष अरुण बरडे, उपाध्यक्ष सचिन ठाकरे, सचिव शरद पवार, संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व केंद्रचालक उपस्थित होते.



Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)