आत्महत्या - अजुन एका संगणक परिचालकाची

Raw Bharat
0

 आत्महत्या - अजुन एका संगणक परिचालकाची

पुसद (प्रतिनिधी) -कोल्हापूर जिल्हा करवीर तालुक्यातील  ग्रामपंचायत संगणक परिचालक प्रसाद टिपूगडे यांनी शासनाचे उदासीन धोरण, तुटपुंजे मानधन, कंपनीचा व कामाचा मानसिक त्रास, घरची गरीब परिस्थिती व असलेले ६९०० रुपये  मानधन  यामुले आर्थिक विवंचनेतुन काल  विष प्राशन केले होते, त्यांचे आज पहाटे त्यांचे दुःखद निधन झाले. 




संगणक परिचालक यांचे आत्महत्या सत्र सुरूच असून, मागील काही दिवसापासून जवळपास ६ आत्महत्या झाल्या आहेत. संगणक परिचालक हे मागील १२ वर्षापासून अविरत काम करीत असून अत्यंत कमी मानधनवर काम करत आहेत. काम जास्त आणि मानधन कमी व ते सुद्धा ४ -४ महीने मिळत नसल्यामुळे  त्याना आर्थिक व मानसिंक अडचणी ना सामना करावा लागत असतो. 

नुकतेच हिवाळी अधिवेशनावर संगनक परिचालक याचा ७ दिवस न्याय व हक्कासठी लढा सुरु होता. मात्र यावेळी सुद्धा सरकारने त्याना निराश केले होते. यामुले अनेक संगणक परिचालक निराश झालेले आहेत. त्यामुले शासनाने याचा गाभीर्याने विचार करने गरजेचे आहे. अन्यथा याचे गंभीर परिणाम पहायला मिळतील. हे सांगायला नको. 


आपल्या परिसरातील बातम्यासाठी  व जाहिरातीकरीता  संपर्क करा. 

👉 अरुण बरडे मो. नं. ९९२१७२२७२६ 

👉 रवि शिंगनकर मो. नं. ८७८८८६४२९८

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)