रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने रॅलीचे आयोजन

Raw Bharat
0

रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने  रॅलीचे आयोजन 

ठाणे  प्रतिनिधी  - 

आज ठाणे येथे सर्व आरटीओ अधिकाऱ्यांच्या सहभागाने आणि मार्गदर्शनात रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने  रॅली काढण्यात आली. त्यामध्ये शेकडो कर्मचारी व ठाणेकरांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.



प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे येथुन रॅलीला सुरूवात झाली. यामध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जंयत पाटील साहेब, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय शेळके साहेब, साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नलावडे साहेब व मोठ्या संखेने नागरिक सहभागी झाले होते. लोकामध्ये जनजागृती करण्याच्या हेतुने ही रॅली आयोजन केली होती. रॅली ठाणे शहराच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातुन सुरू होऊन वर्तकनगर -उपवन-पवार नगर माजीवाडा-तिनहात नाका-नितिन जंक्शन मार्गाने पुन्हा कार्यालयात रॅलीची सांगता झाली. 

प्रतिनिधी - दयानंद गायकवाड सोबत कॅमेरामन ठाकूर, ठाणे

----------------------------------------------------------

या आणि अशा अनेक बातम्यांसाठी आमच्या  न्यूज़ चैनल  ला भेट द्या.

नामांतर सूचना - खुलासा न्यूज़ आता रॉ भारत न्यूज़ झाले आहे.  

धन्यवाद ...


Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)