संगणक परिचालक यांचे नागपुरात आमरण उपोषण

Raw Bharat
0

 संगणक परिचालक यांचे नागपुरात आमरण उपोषण 

जिव गेला तरी बेहत्तर .. आता माघार घेणार नाही - उपोषणकर्ते यांचा निर्धार 

प्रतिनिधी - 

संगणक परिचालक हे मागील १२ वर्षापासून ग्रामपंचायतचा कारभार ऑनलाइन करण्याचे काम इमाने इतबारे करीत आले आहेत. त्याना कंपनीच्या मार्फ़त रोजगार हमीच्या मजुरापेक्षाही कमी रोजंदारीवर काम करावे लागत आहे. त्यांच्या नावाने शासनामार्फ़त कंपनीला जवाळपास बारा हजार रुपये दिले जातात मात्र कंपनीकडून  त्याना फ़क्त सहा हजार नवशे सत्तर रूपये दिले जातात. या व अशा अनेक समस्या सोडवीने साठी व प्रलंबित  मागण्या  मान्य करुन घेण्यासाठी हे संगणक परिचालक विविध आंदोलने करीत आहेत. 


नुकत्याच पार पडलेल्या नागपुर येथील हिवाळी अधिवेशनात त्यानी थंडीच्या दिवसात तब्बल ११ दिवस-रात्र रस्त्यावर झोपून विविध आंदोलने केलीत, परन्तु शासनाने त्याना कोणताही समाधानकारक प्रतिसाद दिल्या नसल्यामुळे आज पासून हे संगणक परिचालक नागपुर येथेच पुनः आमरण उपोषनाला बसले आहेत. 

मागील १२ वर्षात मुंबई, नागपुर व विविध स्तरावर  आंदोलने केली असून शासनाने प्रतेक वेळेस आम्हाला आश्वासन देऊन फसवले आहे. यावेलेस मात्र जिव गेला तरी चालेल परन्तु माघार घेणार नाही असे म़त राज्याध्यक्ष गुणवंत राठोड व इतर १० उपोषणकर्त्यानी आमच्या प्रतिनिधीशी  बोलताना सांगितले.

 

आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी व जाहिरातींसाठी आमच्या चॅनेल ला subscribe करा.

बातम्यांसाठी व जाहिरातींसाठी आम्हाला संपर्क करा.

  • अरुण बरडे - 9921722726
  • रवी शिंगणकर - 8788864298


Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)