विस्तार अधिकारी के.पी.सोनटक्के यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ | Raw Bharat News

Raw Bharat
0


पुसद प्रतिनिधी - 

        पुसद पंचायत समितीचे  पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी के. पी. सोनटक्के  हे  ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाल्याने  पंचायत समिती  पुसदच्या वतीने  त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक  सत्कार करण्यात आला. ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, प्रभारी गटविकास अधिकारी,अशा विविध  पदावर त्यांनी ३४  वर्षे सेवा केली. कर्तव्यदक्ष अधिकारी, मितभाषी, मनमिळावू म्हणून पुसद व उमरखेड पंचायत समितीमध्ये त्यांची ओळख आहे.

        यावेळी  पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय राठोड, पंचायत विभागाचे विस्तार अधिकारी टी. डी.चव्हाण, पिंपळे साहेब, डाखोरे साहेब, प्रधानमंत्री आवास योजनेचे स्थापत्य अभियांत्रिकी आर.ङी.पुरी, ज्ञानेश्वर ढाकरे, विस्तार अधिकारी  सुमित बोजेवार, कृषी अधिकारी शंकर राठोड, संदीप राठोड, दुम्हारे साहेब, ग्रामसेवक संघटना डी. एन. ई. १३६  जिल्हा उपाध्यक्ष टी,पी. राठोड, तालुका अध्यक्ष संजय हिंगाङे,  विजय इसळकर, केंद्रप्रमुख अमित बोजेवार,  शरद पवार, संजय तालपेल्लवार, चंद्रशखेर भालेराव, जतकर साहेब. निलेश होले, रामेश्वर जाधव, चौधरी मँङम, अंभोरे.मँङम,  पारधी मँङम यांच्यासह पंचायत समितीतील अनेक कर्मचारी उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)