पुसद मध्ये महा-सायकल रॅली चे आयोजन | Raw Bharat

Raw Bharat
0


पुसद प्रतिनिधी -
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शंभर टक्के मतदान करून लोकशाही बळकट करावी याकरिता पुसद शहरात महारॅली चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील शाळेचे विद्यार्थी तहसील कर्मचारी, क्रीडा शिक्षक सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी आशिष बीजवल हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी, तहसीलदार महादेव जोरवर, अप्पर तहसीलदार कु. पल्लवी आखरे, मुख्याधिकारी अभिजीत वायकोस, शहर ठाणेदार उमेश बेसरकर, वसंतनगरचे ठाणेदार नंदकिशोर पंत, पंचायत समितीचे  गटविकास अधिकारी संजय राठोड, निवासी तहसीलदार गणेश कदम, नायब तहसीलदार स्नेहल देशमुख, इंगोले साहेब, शेख साहेब, दिलीप कोलेवड, निरंजन पवार, तहसिलचे कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी उपस्थित होते.

या महारॅली ची सुरुवात यशवंत रंगमंदिर पासून करण्यात आली.  या महारॅलीची  उपविभागीय अधिकारी बीजवल यांनी हिरवा झेंडा दाखुन सुरुवात केली. समारोपाच्या वेळी कर्मचारी, व विद्यार्थ्यांच्या पालकांनी शंभर टक्के मतदान करावे असे आव्हान करण्यायात आले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. एच. धुळगुंडे यांनी केले तर आभार तहसीलदार जोरवर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशाकरिता पवन बोजेवार, जय राठोड, सुबोध बहादुरे, देवानंद राठोड, बाळू कराळे, संजय जोशी, जय राठोड, यानी अथक परिश्रम घेतले.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)