जि.प. उच्च प्राथमिक शाळा पार्डी येथे शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा #rawbharat

Raw Bharat
0

 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पार्डी  येथे शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा.


पुसद (पार्डी) - 

केंद्र सरकार च्या मार्गदर्शक सूचनानुसार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पार्डी पंचायत समिती पुसद येथे शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. यात सातही दिवस विषया नुसार उपक्रम सादर करण्यात आले. दिनांक २२  ते २८  जुलै २०२४ पर्यंत चाललेले या सप्ताहात पहिले दिवशी दि २२ ला शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन व शैक्षणिक साहित्याचा अध्यापनात उपयोग याविषयी उपक्रम घेण्यात आले. दिनांक २३  रोजी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान यावर आधारित उपक्रमांचा समावेश करण्यात आला दि. २४ रोजी क्रीडा दिवसानिमित्त विविध देशी खेळ व  मनोरंजन खेळ घेण्यात आले दिनांक २५ रोजी सांस्कृतिक दिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक कार्यक्रम सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी नाट्य ,नृत्य व कलागुण सादर केले. दिनांक २६ रोजी डिजिटल साक्षरते विषयी मार्गदर्शन करण्यात आले दिनांक २७  रोजी मिशन लाईफच्या दृष्टिकोनातून इको क्लब ची स्थापना आणि उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. तर दिनांक २८  रोजी शिक्षण सप्ताहाच्या समारोप निमित्त तिथी भोजन (स्नेहभोजनचे)आयोजन करण्यात आले होते. 


या कार्यक्रमाला व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. नागोरावजी चिरमाडे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य   (शिक्षण प्रेमी) श्री अरुण भाऊ बरडे, मुख्याध्यापक श्री संतोष पदमवार, स. शिक्षक श्री वाघोडे सर,  वैशाली तायडे (कदम ) मॅडम, प्रगती कदम मॅडम यांनी सहकार्य केले.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)