पुसद- शेंबाळपिंपरी रोडवर दुचाकीचा अपघात

Raw Bharat
0

 पुसद- शेंबाळपिंपरी  रोडवर दुचाकीचा अपघात

पुसद - प्रतिनिधि 

पुसद-शेंबाळपिंपरी  रोडवर असलेल्या हिवळणी येथे रोडवर अपघात झाला असून यामध्ये धानोरा येथील महाधन फर्टीलायज़र मधे काम करणारा राम हाके (वय २५ वर्ष अंदाजे) नावाचा दुचाकीस्वार गाडी नं -MH -29 BB4744 व गयाबाई कांबळे यांची बकरी यांच्यात  टक्कर झाली.


यात दुचाकीस्वार हा जखमी झाला असून, त्याला पिंपरी येथे दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याला नांदेड येथे नेण्याचा सल्ला दिला. यामध्ये बकरीचा मृत्यू झाला असून तिची अंदाजे किंमत 15 हजार असल्याचे बकरी मालक कांबळे यांनी सांगितले. घटनास्थालाला खंडाला पोलीस स्टेशन चे PSI यानी भेट दिली असून पुढील तपास सुरु आहे. अपघाताचे कारण अध्याप समजू शकले नाही. 


प्रतिनिधी - तुषार  व्यवहारे, पुसद 
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)